भिवंडी कोनगाव येथे जय म्हसोबा बैलगाडा संघटनेतर्फे छकड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन।



भिवंडी : नीतू विश्वकर्मा
भिवंडी कोनगाव येथे आज जय म्हसोबा बैलगाडा संघटनेच्या वतीने पारंपरिक छकड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले. कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेने ग्रामीण भागातील लोकांचा उत्साह उंचावला. या रंगतदार आणि उत्साहपूर्ण शर्यतीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि बैलगाडा शर्यतीत सहभागी शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
या शर्यतीत पारंपरिक बैलगाड्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे प्राचीन ग्रामीण खेळ आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात यश आले. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच अशा उपक्रमांमुळे ग्रामीण संस्कृतीचे जतन होईल आणि पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन करण्यात आले.