उल्हासनगरमध्ये विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे उद्घाटन.



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
प्रदीप दिलीप गरड यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर कॅम्प चार येथील व्हीटीसी ग्राउंड रोडे परिसरात विठाई प्रतिष्ठान संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाची खास सोहळा सौ. रेखा दिलीप गरड यांच्या हस्ते पार पडला.
विठाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दिलीप गरड यांनी या संस्थेची स्थापना समाजकल्याणाच्या उद्देशाने केली असून, याआधीही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सांगली पूरग्रस्त क्षेत्रात मदत, कोरोना काळात लोकांना मदतीचा हात, शासकीय मुलांचे बाल वस्तीगृह, वृद्धाश्रम यांसारख्या विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर, वाढदिवस, दिवाळी अशा सणांना सहकाऱ्यांसोबत साजरा करून समाजसेवा केली आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रदीप गरड यांनी सांगितले की, “मदत गरजेची तेथे हमी विठाई संस्थेची” हे बोधवाक्य लक्षात ठेवून समाजहितासाठी विविध लोकोपयोगी कार्य मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहेत.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, मनविसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, विभागाध्यक्ष सुहास बनसोडे, भीम आर्मीचे शहराध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष हेमंत जाधव, समाजसेवक योगेश म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील समाजसेवक, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मित्रपरिवार यांनी विठाई प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.