लालचक्की, वॉटर सप्लाय, उल्हासनगर -४ येथील पाण्याची टाकी तात्काळ सुरू करावीत- मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची पुन्हा मागणी.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
करोडो रुपये खर्च करून उल्हासनगर महानगरपालिकेने कोणार्कला निळ्या लाईनचे टेंडर दिले होते त्यात लालचक्की येथील पाण्याची टाकी देखील बनवली गेली होती.परंतु गेले अनेक वर्षे सदर टाकी ही बंद अस्वथेत आहे. यासाठी मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांनी अनेक वेळा टाकी समोर टाकीवर आंदोलने केली होती. त्यावेळेस आश्वासने मिळाली गेली व काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या ज्यात १.लालचक्की येथील अनेक भागात निळ्या लाईन टाकल्या गेल्या नव्हत्या.२.अनेक ठिकाणी टाकीचे लिकेजस. या सर्व कारणांमुळे लालचक्की वॉटर सप्लाय येथील पाण्याची टाकी सुरू झाली नाही. परंतु सदरचा पाठपुरावा मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांच्याकडून सातत्याने होत होता.आता जवळपास सर्वच कामे मार्गी लागत आहे व ती पूर्ण देखील होतांना दिसत आहे. परंतु सदरचे काम हे वेगवान गतीने होऊन सदर टाकी नागरिकांसाठी खुली करावीत अशी पुन्हा मागणी अँड.प्रदिप गोडसे यांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर टाकी सुरू झाल्यास खास करून आझाद नगर, सीताराम नगर काही भाग, सार्वजनिक परिसर, सुभाष टेकडी रोड परिसर, उत्कर्ष नगर, होली फॅमिली शाळा परिसर, साने गुरुजी नगर, स्टेशन रोड, अंबिका नगर, शिवमार्ग, हनुमान टेकडी या सर्वच भागात बिना मोटर लावता नागरिकांना प्रेशर ने पाणी मिळेल व निर्माण झालेली पाणी समस्या टाळता येईल. म्हणजेच पाण्याची टाकी सुरू झाल्याने प्रभाग १३ मधील अनेक भागातील पाणी समस्या मार्गी लागून नागरिकांना बिना मोटर प्रेशर ने पाणी मिळणार आहे. असे अँड.प्रदिप गोडसे यांनी सांगितले आहे.जर पाण्याची टाकी सुरू नाही केली तर येत्या काही दिवसात ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे महापालिका प्रशासन यांना निवेदन मार्फत संगितले आहे.
सदरच्या पत्रावर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंग्रेकार साहेब व मुख्य अभियंता वानखेडे साहेब यांनी सकारात्मक चर्चा केली व सदर टाकी तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.
Great👍👍👍 job Bhavi Nagarsevak Mhanun aashich manse pahijet . Upadate AGGRESSIVE