नेताजी चौक ते कैलास कॉलनी हा रस्ता शिवरात्री च्या आधी सुस्थित करा – मनसे

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहरात एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातुन अनेक रस्त्याची कामे सरू आहेत. ही सर्व कामे अत्यंत संत गतीने सरू असल्याने शहरातील नागरिकांना याचा त्रासा सहन करावा लगत आहे. यातील काही कामांच्या वर्कओर्डरची मुदत संपून बराच काळ लोटला याचे प्रशासन ही कामे वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून प्रयन्त्नशील दिसत नाही किंवा प्रशासनाला नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाशी काही देणं घेणं नाही.
आटता पर्यंत कामात दिरंगाई होऊन सुद्धा ठेकेदारावर कुट्चलीही कारवाई करतांना दिसत नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जची होत आहेत ठेकेदारानांवर प्रशासनाचा कुठलीही अंकुश दिसत नाही असा आरोप मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यानी MMRDA प्रशासनावर केला आहे.
नेताजी चौक ते कैलास कॉलनी या रस्त्याचे काम महाशिवरात्री पर्यंत होणे अपेक्षित होते. याचा कारण महाशिवरात्रीला अंबरनाथ शिवमंदिरात मोटी यात्रा असते. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. व या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भाविकांची मोटी गैर-सोय होणार आहे याची काळजी प्रशासनाने गेणे अपेक्षित होत.
जर 24 तारखे पर्यंत भाविकांसाठी हा रस्ता सुस्थितीत केला नाही तर मनसेच्या वतीने MMRDA ला आंदोलनाचा ईशारा देण्यात आहे.