संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी — मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
15 फरवरी 2025 — मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पणाने झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आपल्या श्रद्धेची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाल विनोद यांनी समर्थपणे केले. कार्यक्रमाला सुशील राठोड, पवार विजय, चव्हाण संगीता (कार्यालयीन अधीक्षक), राजेश चव्हाण, डॉ. मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणांद्वारे संत सेवालाल महाराज यांच्या महान कार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा जागर करण्याचे आवाहन केले.
राजू चव्हाण यांनी डॉ. मनोहर बनसोडे आणि संगीता चव्हाण यांचा सन्मान अनोख्या पद्धतीने केला. त्यांनी हात बनावट आरसा, कवडी मौल्यवान आणि पवित्र पट्टा सप्रेम भेट देत त्यांचा सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मनोहर बनसोडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा भारतीय संविधानाशी असलेला वैचारिक संबंध स्पष्ट करत, “आग लगी आकाश को, झरझर गिरी अंगार, अगर इस संसार में संत न होते तो जल मरता संसार…” या ओळींनी आपल्या भाषणाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या शेवटी भाल विनोद यांनी आभार प्रदर्शन केले. संत सेवालाल महाराज यांच्या विचारांना वंदन करीत कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.