Kalyan News: लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना ठाणे जिल्हाध्यक्षपदी संदीप साळवे आणि कल्याण तालुका अध्यक्ष पदी निकेत व्यवहारे व कार्याध्यक्षपदी अविनाश सुक्रे यांची नियुक्ती.
कल्याण ग्रामीण : नीतू विश्वकर्मा
कल्याण ग्रामीण (Kalyan Rural) भागातील सामजिक कार्यकर्ते श्री. निकेत सखाराम व्यवहारे यांच्या वाढदिवसा (Birthday) निमित्त लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी कल्याण तालुक्याचे डॅशिंग पत्रकार,एस.एस महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक संदीप साळवे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच कल्याण तालुका अध्यक्ष पदी श्री.निकेत व्यवहारे आणि कल्याण तालुका कार्याध्यक्षपदी अविनाश सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली.या वेळी लोकपालक पत्रकार (Press) सुरक्षा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप रोकडे,प्रादेक्षिक सचिव भरत कांरडे,संघटक सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव संतोष क्षेत्रे, हिंदी सामना दैनिकचे अनील मिश्रा,आजतक (Aajtak News) चे विशाल कुरकुटे,यश महाराष्ट्र (Maharashtra) दैनिक चे सिनील सल्वेडोर उपस्थित होते.