”साई वसंत शहा उद्यान” तोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत उल्हासनगर कांग्रेसनी दिले महानगरपालिका आयुक्तांना निवेदन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी उपरुक्त विषय संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले,त्या मध्ये अशे नमूद करण्यात आले कि. दोन वर्षांपूर्वी उल्हासनगर-४ व्हिनस चौक येथे “साई वसंत शहा” नावाने उद्यान महानगरपालिकेच्या निधीतून पंधरा लाख रुपयांचा निधी वापरून इथे उद्यान उभारण्यात आले होते ,सदर उद्यानाच्या उद्घाटनात मोठ्या प्रमाणात स्थानिक नगरसेवक, आमदार आणि मंत्री उपस्थित होते.
उद्यानाच्या उभारणीसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी खर्च झाला असून काही दिवसांपूर्वी त्या उद्यानाच्या मागे एका बिल्डरचे सदनिकेचे काम सुरू असल्याने, सदर उद्यान अचानकपणे तोडण्यात आले.
सदर उद्यान महानगरपालिकेने तोडले आहे किंवा बिल्डरने तोडले आहे याची स्पष्टता करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आले तसेच जर हे उद्यान डी.पी रोड मध्ये बाधित होत असल्याने तोडण्यात येत आहे असं स्पष्टीकरण भेटत असले तरी देखील, जेव्हा सुरवातीला उद्यान उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली तेव्हा मंजूर विकास आराखड्याप्रमाणे का काम करण्यात आले नाही? यासाठी संबंधित ठेकेदार ,पीडब्ल्यूडी अधिकारी, महानगरपालिका टाऊन प्लॅनिंगचे सर्व अधिकारी जबाबदार आहेत.
तरी यांच्यावर महानगरपालिका व जनतेच्या पैशाचा नुकसान करण्यासंबंधित जे काही कायद्यात तरतूद असेल त्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये यासाठी दाद मागण्यात येईल आणि याचे सर्व जवाबदारी आपल्यावर असेल अशे नमूद करण्यात आले आहे.
सदर पत्राचे एक प्रत जिल्हाधिकारी ठाणे व प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय यांना देखील देण्यात आले.