जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीचे महत्त्वाचे काम; १७ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) तर्फे जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रात महत्त्वाचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून ते मंगळवार, १८ मार्च २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत (२४ तास) पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
या दुरुस्तीमुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका तसेच परिसरातील इतर ग्रामपंचायतींना जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
दुरुस्तीच्या कामानंतर बुधवार, १९ मार्च २०२५ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ शकतो, अशी शक्यता MIDCने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ते पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.