चला आई एकविरा देवी दर्शनाला आमदार निलेश लंके साहेब सोबतीला…! महिलांना मोफत आई एकविरा देवदर्शन यात्रा २०२३.
कल्याण ग्रामीण : नीतू विश्वकर्मा
पारनेर विधानसभाचे (Parner Vidhan Sabha) लोकप्रिय कार्यसम्राट लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब (Nilesh Dnyandev Lanke) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima/Sharad Purnima) निमित्त पारनेर-नगर (Parner-Nagar) मतदारसंघातून स्वतःच्या उदरनिर्वाह साठी मुंबई(Mumbai), ठाणे(Thane), कल्याण(Kalyan), उल्हासनगर(Ulhasnagar),सारख्या मायानगरीत स्थलांतरित झालेल्या माता भागिनीसाठी मोफत आई एकविरा (Aai Ekvira Temple) देवदर्शनाचे आयोजन केले असून जवळपास १०० लक्झरी बसेस आई एकविरा देवी देवस्थान कार्ला येथे रवाना होणार आहे.या वेळी लोकनेते आमदार निलेशजी लंके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व बसेस वेगवेगळ्या विभागातून येणार असून या मध्ये उल्हासनगर,कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ आणि वरप विभागातील २५० महिला दर्शनाचा लाभ घेणार असून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.येत्या शनिवारी २८ऑक्टोंबर २०२३ रोजी कल्याण-नगर हायवे लगत असलेल्या थारवानी गृहसंकुल(म्हारळपाडा) येथून ७.३० वाजता बसेसे निघणार आहे. अशी माहिती उल्हासनगर व कल्याण ग्रामीण भागातील निलेश लंके प्रतिष्ठानच्या सभासदांनी दिली.