बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याची मागणी – मनसे आक्रमक.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा २ एप्रिल २०२५: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरण्याची मागणी करण्यात आली आहे. गुढी पाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी यासंदर्भात ठोस भूमिका मांडली. त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते व आमदार मा. प्रमोद (राजुदादा) पाटील तसेच ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष मा. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर कॅम्प-४ येथे विविध बँकांना निवेदन देण्यात आले.मनसेच्या लालगड शाखेच्या वतीने बँक व्यवस्थापनांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले की, बँक कर्मचारी आणि व्यवस्थापनाने दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी ए.टी.एम. सेवा आणि इतर बँकिंग सुविधांमध्येही मराठी भाषेचा समावेश करावा.१५ दिवसांची अल्टिमेटममनसे कार्यकर्त्यांनी बँक व्यवस्थापकांना १५ दिवसांची अल्टिमेटम दिली असून, त्या कालावधीत मराठी भाषेच्या सक्तीबाबत पावले उचलण्यात न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान हिंदी भाषेतील पोस्टर हटविण्यात आले.बँक व्यवस्थापनाचा सकारात्मक प्रतिसादबँक व्यवस्थापकांनी मनसेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तितक्या लवकर मराठी भाषा सक्तीची केली जाईल, असे आश्वासन दिले.या आंदोलनात मनसेचे उपशहर अध्यक्ष सागर रणवीरसिंग चौहान, विभाग अध्यक्ष नितेश भरत चव्हाण, विभाग उपाध्यक्ष वैभव शिंदे, शाखा अध्यक्ष मनोज भांगे, तसेच महाराष्ट्र सैनिक आकाश कांबळे, जयेश सावंत, हर्षद सोनवणे, सुमित जैस्वाल आणि भूषण जाधव आदी कार्यकर्ते सहभागी होते.