पुलवामा अतिरेकी हल्ल्यात निष्पापांचा बळी; पाकिस्तानच्या卐 षडयंत्राचा धिक्कार – उल्हासनगरात संभाजी चौक शिवसेनेतर्फे श्रद्धांजली सभा.

उल्हासनगर प्रतिनिधि : नीतू विश्वकर्मा
पुलवामा, जम्मू काश्मीर | 23 एप्रिल 2025
पुलवामा येथे पुन्हा एकदा अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांचा स्पष्ट सहभाग असून, शेजारी देश अजूनही दहशतवादाचा पाठिंबा थांबवत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या पार्श्वभूमीवर उल्हासनगर ४ येथील संभाजी चौकात, शिवसेना (दगडी शाखा) यांच्या वतीने सायंकाळी भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी दिवे लावून, पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“पाकिस्तानचा दहशतवाद निरपराधांवर चालून येतोय – ही थांबवण्याची वेळ आली आहे!”
या वेळी बोलताना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणांचा निषेध केला.
देशात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अशा भ्याड हल्ल्यांवर कठोर कारवाई करणे आता काळाची गरज बनली आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याची चौकशी करून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर संदेश द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.