उल्हासनगरात पाणीपट्टी दरवाढीवर संतापाचा भडका – मनसेचे उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेने १ एप्रिल २०२५ पासून पाणीपट्टी बिलामध्ये केलेली भरमसाठ दरवाढ नागरिकांच्या माथी मारण्यात आली आहे. जुन्या दराच्या तुलनेत दुपटीहून अधिक दरवाढ झाल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात मनसेच्या मराठा गड शाखेचे उपाध्यक्ष श्री. सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबवली जात आहे.
#सह्यांची मोहीम
दिनांक: गुरुवार, १० एप्रिल २०२५
वेळ: सायं. ५ ते रात्री ९ वा.
स्थळ: जिजामाता उद्यान चौक, मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४
सचिन कदम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “तुमची एक सही ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी निर्णायक ठरू शकते. सर्वांनी पुढे येऊन आपला विरोध नोंदवा.”
मनसेच्या या आंदोलनात उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
सचिन कदम – उपाध्यक्ष, मनसे
9323739368
(मराठा गड शाखेतील सर्व पदाधिकारी व सहकारी यांच्या वतीने)