उल्हासनगर शहरात पाणी व रस्त्यांच्या समस्या तीव्र; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं आंदोलन.

उल्हासनगर प्रतिनिधि नीतू विश्वकर्मा
दि. २ मे २०२५ –
उल्हासनगर शहरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून विविध नागरी समस्या सहन करत आहेत. यामध्ये विशेषतः पाणीपुरवठ्याची अनियमितता, वाढलेले पाणी दर, रस्त्यांचे अत्यंत खराब व अपूर्ण स्थितीतले काम, आणि प्रदूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचा धोका या गंभीर समस्या समाविष्ट आहेत.
यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. पिण्याचे पाणी पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त असून कावीळ, मलेरिया यांसारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. दुसरीकडे, अनेक ठिकाणी रस्ते खोदून तसेच सोडले गेले असून त्यामुळं अपघात होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
या सर्व समस्यांकडे पालिका प्रशासनाने वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने “जन आक्रोश आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे.
दि. २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उल्हासनगर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन तसेच प्रशासनाला जाग आणण्यासाठी होम हवन करण्यात येणार आहे.
पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री. धनंजय बोडारे, उपजिल्हा प्रमुख श्री. राजेंद्र शाहू, शहर प्रमुख श्री. कुलविंदर बैस (प्रभाग १,२,३), श्री. कैलाश तेजी (प्रभाग ४,५) यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उल्हासनगरकरांनो, आता गप्प बसण्याची वेळ नाही – आपल्या हक्कासाठी आवाज उठवूया!