पोलिस रिमांड कामकाजातील अन्याय्य प्रथा थांबविण्यासाठी DCP Zone-4 सचिन गोरे यांचे आश्वासन

उल्हासनगर प्रतिनिधि : नीतू विश्वकर्मा
स्वराज्य संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने आज माननीय पोलिस उप-आयुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन पोलिसांकडून काही ठराविक वकिलांकडेच रिमांडची कामे देण्याच्या प्रथेबाबत चर्चा केली.
या चर्चेदरम्यान, ही पद्धत थांबविण्यासाठी आणि सर्व वकिलांना समान संधी मिळावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन DCP सचिन गोरे यांनी दिले. त्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी बोलून अशा प्रकारच्या गोष्टींना पायबंद घालण्यात येईल आणि भविष्यात ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, असेही स्पष्ट केले.
बैठकीत, या अन्याय्य प्रथेचा परिणाम ज्युनियर वकिलांच्या आर्थिक नुकसानीवर होत असल्याची बाबही गोरे साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी या समस्येवर गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी स्वराज्य संघटना विधी विभागाचे प्रदेश अध्यक्ष व उल्हासनगर तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. सचिन खंडागळे, ॲड. राहुल बनकर, ॲड. निखिलेश असराणी, ॲड. सन्नी लबाना, ॲड. ओम कराड, ॲड. विशाल संसारे उपस्थित होते.
ही माहिती स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.