गेल्या दहा वर्षा प्रमाणे या वर्षी देखील शिवसेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्व परिसरात २ हजाराहून अधिक जेष्ठ नागरीकांना विनामुल्य छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
गेल्या दहा वर्षा प्रमाणे या वर्षी देखील शिवसेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्व परिसरात २ हजाराहून अधिक जेष्ठ नागरीकांना विनामुल्य छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या समयी उपस्थित जेष्ठ नागरिक तसेच जेष्ठ महिलांना मार्गदर्शन करताना त्यांच्या प्रती आपली कृवज्ञता व्यक्त केली तसेच जेष्ठ नागरिक हे अनुभवाने समृद्ध असतात, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला मिळणारे वेळोवेळीचे #मार्गदर्शन मोलाचे असते, म्हणूनच जेष्ठ नागरीकांनी आपल्या अनुभवाचा फायदा युवा पिढीलाही करून द्यावा असे आवाहन यावेळी केले.
आपल्या संपूर्ण आयुष्यातील कर्तव्ये पार पाडत असतांना आपल्या कमाईची रक्कम कुटुंबियांसाठी आवश्यक तेवढी जरूर खर्च करावी परंतु उर्वरीत शिल्लक रक्कम स्वःताच्या उतार वयातील गरजा भागविण्यासाठी शिल्लक ठेवावी असा अनमोल सल्ला जेष्ठ नागरीकांना दिला.
यावेळी महिला जिल्हा प्रमुख छायाताई वाघमारे, पुष्पाताई ठाकरे, उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर, उपशहर प्रमुख प्रशांत बोटे,मा.नगरसेवक राजाराम पावशे, कल्याण धुमाळ,मा.नगरसेविका संगिता गायकवाड, सुशिला माळी आदी मान्यवर शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.