जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे फुटबॉल असोसिएशनच्या ज्युनिअर मुलींचे विजेतेपद तर मुलांचे उपविजेतेपद.
ठाणे: नीतू विश्वकर्मा
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे फुटबॉल असोसिएशनने ऐतिहासिक कामगिरी केली. ठाणे फुटबॉल संघटनेच्या ज्युनिअर गटातील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर सब ज्युनिअर गटात मुलांच्या संघाला अंतिम सामन्यात उपविजतेपेदावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या ज्युनिअर संघाने अखेरच्या सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाविरोधात अप्रतिम कामगिरी करत ठाण्याने विजेतेपदावर आपले नाव कोरले. या संघातील न्यासा बोंद्रेने तब्बल 25 यार्ड अंतरावरून फ्री किकद्वारे केलेल्या अप्रतिम गोलने मुलींच्या संघाला कोल्हापूरविरोधात 1-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. जी ठाण्याच्या मुलींच्या संघाने अखेरपर्यंत कायम कायम राखत कोल्हापूरला पराभवाची धूळ चारली.
तर ठाण्याच्या सब ज्युनिअर गटातील मुलांच्या संघानेही चमकदार कामगिरी करत सेमी फायनलमध्ये पुण्याच्या संघाला 2-0 अशी धूळ चारत धडाक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम सामन्यात त्यांना मुंबईच्या संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेमध्ये केलेल्या सुंदर खेळाच्या जोरावर मुलींच्या संघातील हरलिन कौरने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने तर मुलांच्या संघातून सत्यजित यादवने आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर बेस्ट गोल किपरचा सन्मान पटकावला.
अनेक वर्षांनंतर ठाणे फुटबॉल संघटनेच्या मुलं आणि मुलींनी जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार असून त्यामुळे जिल्ह्यातील या नव्या मुलांमध्ये असणारी प्रतिभा दिसून येत आहे. आणि या स्पर्धेच्या विजयाने ठाणे फुटबॉल संघटनेच्या खेळाडूंसाठी भविष्यातील अनेक संधींचे दरवाजे खुले झाले आहेत. तर ठाणे फुटबॉल असोसिएशनच्या दोन्ही संघांनी पटकाविलेल्या या विजयाबद्दल संघटनेचे सचिव सुनिल पुजारी यांनी विशेष कौतुक केले आहे.
तर या विजेतेपदामध्ये ज्युनिअर मुलींच्या टीमचे कोच अनिश पोळ, टीम मॅनेजर व्हिक्टोरिया गिल आणि सब ज्युनिअर मुलांच्या टीमचे कोच इनोक गील, टीम मॅनेजर एल्टन डीसुझा
यांच्यासह लेस्टर फर्नांडिस, लेस्टर पीटर्स आणि प्रशांत गवई यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.