उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या दालनात अंबरनाथ MIDC मधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी CETP प्लांट संदर्भात बैठक.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ मधिल वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा व एम.आय.डी.सी. मधिल CETP प्लांट द्वारेच रसायनिक पाण्याची प्रक्रिया व्हावी तसेच कोणताच प्रकारचे रसायनयुक्त पाणी सांडपाणी प्रवाह अथवा नदी येथे सोडता कामा नाही या बाबत तातडीची बैठक माझ्या मागणीनुसार उद्योग मंत्री मा.श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या दालनात पार पडली .
येत्या आठवड्याभरात CETP प्रक्रिया करिता केलेल्या सर्व कंपण्यांच्या अर्जाला मंजुरी देऊन रासायनयुक्त पाण्याचे कुठल्याच प्रकारचे प्रदुषण होता कामा नाही अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाही केली जाईल अशी सक्त ताकीद मंत्री महोदय यांनी उपस्थित अधिकारी यांना दिली.यावेळी एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून होणाऱ्या पाणी पुरवठ्या भागात मोठी लाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात बाबत देखिल चर्चा केली.
याबैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या सौ. मालतीताई पवार, सौ. ज्योती ताई राणे,समाजसेवक श्री.श्याम पाटील,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण प्रादेशिक अधिकारी,एम.आय.डी.सी.अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,मुख्य कार्यकारी अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य अभियंता, तसेच इतर संबंधित अधिकरी उपस्थित होते.