दहावीत १०० टक्के मिळवणाऱ्या आणि पहिल्याच प्रयत्नात यु.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा केला गौरव..!
कल्याण : नीतू विश्वकर्मा
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के मिळवलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच यू.पी.एस.सी. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा गौरव केला.
शालेय जीवनात दहावीच्या परीक्षेला तर उमेदीच्या काळात यु.पी.एस.सी. परीक्षेला अनन्य साधारण महत्व आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मोहने भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एकीने दहावीच्या परीक्षेत तर दुसरीने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. कु.सृष्टी काळे हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण प्राप्त केले. तर कु.श्वेता डोंगरे या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात यु.पी.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. ही गोड बातमी समजताच त्यांच्या घरी जाऊन या विद्यार्थिनींची भेट घेतली. आणि त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासमवेत विभाग प्रमुख राम तरे, शाखाप्रमुख रोहन कोट, राजा पाटील, विजय परियार, युवासेना शहर प्रमुख दिनेश निकम तसेच शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते.