अंशतः अंध कुमारी राणी पगारे यांना सोयी सुविधा व भत्ता अदा करण्यात आला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
आज दिनांक 18 जुलाई 2024 रोजी अंशतः अंध कुमारी राणी पगारे वय 18 वर्ष उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा विभागात उपस्थित होती . सदर विद्यार्थिनीला समग्र शिक्षा विभागामार्फत इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावी पर्यंत सर्व सोयी सुविधा व भत्ता अदा करण्यात आलेले आहे. पालकाचे असे म्हणणे आहे की १८ वर्षाच्या पुढे आमच्या मुलीला रोजगार व्यवसाय व प्रशिक्षण इत्यादी बाबत सहकार्य करावे अशी विनंती अर्ज त्यांनी कार्यालयात दिले आहे यावेळी कुमारी राणी पगारे आणि पगारे तिचे वडील व श्री रमेश आगळे अध्यक्ष मुन्सिपल लेबर युनिट व सौ. संगीता लहाने समग्र शिक्षा विभाग मनपा समन्वयक उपस्थित होत्या.
पालकांना व विद्यार्थिनीला उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले व यापुढेही माझ्या मुलींला व्यवसाय प्रशिक्षणासाठी आपण दिव्यांग कल्याणकारी योजने तून सहकार्य करावे असा विनंती अर्ज पालकांनी केला आहे. याबाबतीत आम्ही पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन श्री रमेश आगळे यांनी केले .