जिसे ढूंढा गली गली, वो KDMC पर मिली(गांजा).
कल्याण : नीतू विश्वकर्मा
आज कल्याण पुर्व KDMC D वार्ड येथे अक्षदा म्हात्रे यांच्या श्रद्धांजलि सभेचा आयोजन करण्यात आला होता या सभेसाठी श्री. अप्पा शिंदे, श्री. महेश गायकवाड, श्री. हर्षवर्धन पालांडे, श्री. शरद पाटील, श्री. उदय रसाळ, सौ. राधिका गुप्ते, शाहीन मुल्ला व कल्याण पूर्वेतील अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते. सभेत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले, शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी साठी अम्ली पदार्थाचे सेवन करणारे तरुण जवाबदार आहेत असे अनेकजण सांगत होते त्याच दरम्यान नेहमी प्रमाणे KDMC D वार्ड येथे असलेल्या सार्वजनिक शौचालय येथे पाच ते सहा तरुण गांजा चरस चिलम ओढ़त होते. सभेत उपस्थित असलेल्या सर्व जागरूक नागरिक त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी त्या नशेखोर तरुणांना पोलिसांचा ताब्यात दिला.खरं म्हणजे त्या ठिकाणी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर ज्ञान केंद्र व बाबासाहेबांचा पवित्र स्मारक आहे त्याचा देखील पावित्र जपला जात नाहीये. कल्याण पूर्वेत असे अनेक ठिकाण आहे जिथे नशेखोरांनी आपला अड्डा बनवलेला आहे. मात्रा पोलिसांची यांच्यावर कुठलीही करवाई होत नाही.
मात्रा या पुढे तरी कल्याण सहित सबंध महाराष्ट्रात पोलिस प्रशासन नशामुक्तिसाठी निःस्वार्थपणे काम करतील अशी लोकांची अपेक्षा आहे.