टॅक्स पावती वाटप केलेल्या महिलांचे पेमेंट दिनांक 25 मे पर्यंत कॉलब्रो कंपनी तर्फे न झाल्यास महानगरपालिके समोर उपोषणास बसण्या बाबत चे निवेदन काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्री अजीज शेख यांना दिले.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी मा आयुक्तांना वारंवार भेटून बचत गटाच्या महिलांनी ज्या टॅक्स पावती वाटप केलेले आहे त्यांच्या कामाचे पैसे कॉलब्रो कंपनी तर्फे देण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून ,बचत गटाच्या महिलांसोबत येऊन सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे की त्यांचे कामाचे पैसे त्यांना त्वरित देण्यात यावे, पावती वाटप करून आठ दहा महिने झाले ,कॉलब्रो कंपनी स्वतःच्या बिल काढत असताना देखील महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही, त्यांच्या रोजगाराचे पैसे मिळत नाही ही महानगरपालिकेला शरम आणणारी गोष्ट आहे, सादर कंपनी जाणून बुजून महिला बचत गटाच्या महिलां तर्फे हे काम हिरावून घेऊन कंत्राटी पदतीने करण्यासाठी बचत गटाच्या महिलांना त्रास देत आहे ,बचत गटाच्या महिला ह्या अत्यंत गरजू महिला आहेत त्यांचे पेमेंट ताबडतोब व्हायला पाहिजे ,पावत्या झाल्यावर एक महिन्याच्या आत तरी त्यांचे पेमेंट व्हायलाच हवे ह्याची जवाबदारी महानगरपालिकेने घ्यायला हवी ,आता सोमवार दिनांक २५/५/२०२४ पर्यंत पेमेंट न झाल्यास सर्व बचत गटाच्या महिलां सोबत काँग्रेस पार्टी तर्फे आमरण उपोषण घेण्यात येईल अशे त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.
आता मा आयुक्त महिला बचत गटाला न्याय देतात कि कॉलब्रो कंपनीच्या दबावात येतात ह्या वर काँग्रेस पक्ष लक्ष ठवून असेल