म्हारळ गावात युवासेनेच्या वतीने अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे यांना वाहिली श्रद्धांजली.



म्हारळ: नीतू विश्वकर्मा
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राला हादरवून ठेवणारी गोष्ट म्हणजे अक्षता म्हात्रे यांचा मंदिरातीलच सेवेकरांनी केलेला अत्याचार व निर्घृण हत्या हे प्रकरण ताजे असतानाच काल परवा झालेल्या उरण येथे कुमारी यशश्री शिंदे हिच्यावर देखील बळजबरी करून तिचे गुप्ता अवयव कापण्यात आले. म्हारळ शहराचे युवासेनेचे निकेत व्यवहारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले की महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत. एकीकडे महाराष्ट्रत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असताना दुसरीकडे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला माझी लाडकी बहीण वाचवा मोहीम सुरू केली पाहिजे. ज्या प्रकारे निवडणुका अगोदर माझी लाडकी बहिण योजना आणली आहे त्याच प्रकारे त्या नराधमांना निवडणुका अगोदरच फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या वेळी शहर प्रमुख प्रकाश चौधरी सह महिला संघटिका भावना भारिंबे तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.