Kalyan: वैभव गणपत गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
वैभव गणपत गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष (Kalyan BJP Youth Wing President Vaibhav Ganpat Gaikwad) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉल येथे करण्यात आले होते. माननीय केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज श्री कपिल पाटील साहेब,माजी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते श्री जगन्नाथ पाटीलजी,माननीय आमदार श्री गणपत गायकवाड,माजी आमदार नरेंद्र पवार,जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी,महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई चौधरी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. निखिल चव्हाण, भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील,भाजपा टिटवाळा मंडल अध्यक्ष श्री.शक्तीवान भोईर यांच्या सोबत भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.