Kalyan Lok Sabha News:कल्याण लोकसभा मतदारसंघात राज्यातील पहिले मेगाहब, इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येणार आहे.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha) राज्यातील पहिले मेगाहब, इन्क्युबेटर आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. कल्याण तालुक्यात हे भव्य केंद्र उभारले जाणार असून यातून केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर आसपासच्या भागातील तरुणांना स्वतःचा उद्योग उभारणीसाठी मोठी मदत होणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून या (MP Doctor Shrikant Eknath Shinde) प्रकल्पाच्या उभारणी संदर्भात मंत्रालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या केंद्र उभारणीच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे.
या केंद्राच्या बांधकामाचे नियोजन करण्यासाठी योग्य कंपन्यांची नेमणूक करणे तसेच त्यासाठी योग्य वास्तुविशारद यांच्याकडून प्रकल्पाचे आरेखन करून घेणे
स्टार्टअप सुरू करण्यासाठी नव उद्योजकांना विविध कार्यालयांना भेटी देत अनेक प्रक्रियांना सामोरे जावे लागते. या केंद्राच्या उभारणीमुळे नव उद्योजकांना स्टार्ट अप सुरू करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यातील महत्वाची गोष्ट म्हणजे या केंद्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण करणे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी.
उद्योग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याचे काम या केंद्रा मार्फत केले जाणार आहे.
मेगाहब हे प्रामुख्याने स्टार्ट अप सुरू करणार्यांसाठी, उद्योजकांसाठी, संशोधन आणि शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
राज्य सरकारमार्फत (Maharashtra Government) उद्योगांसाठी देण्यात येणार्या विविध मान्यता, आवश्यक बैठका, चर्चासत्र, परिषदांचे आयोजन मेगाहबमार्फत करण्यात येईल.
यामध्ये प्रामुख्याने फिनटेक, डेटा सेंटर्स, औषधी कंपन्या, वाहन उद्योग, उत्पादन यांचा समावेश असेल
यासर्व महत्वाच्या विषयांसह प्रकल्प जलद गतीने उभारण्यासाठी कार्यवाही करण्याच्या या वेळी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना यावेळी दिल्या. या प्रसंगी उद्योग, परिवहन, महाआयटी, ठाणे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.