मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेत आज 35 युवक/युवतींना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे शिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या योजने अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेने एकूण मंजूर पदांच्या 5% म्हणजेच 162 युवकांना उक्त योजनेत प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर शासनाच्या धोरणानुसार युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती दिली जात आहे.
आज प्राप्त अर्जांची छाननी करून 35 युवकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
आयुक्त विकास ढाकणे व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व किशोर गवस यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीसाठी अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागात त्वरित जमा करण्याचे आवाहन केले आहे.
१. शासनाच्या खालील संकेतस्थळावर नोंदणी करावी
२. महापालिका आस्थापनेवर एकूण ३२५२ एवढी पदे मंजूर असून त्याच्या ५ टक्के म्हणजेच १६२ उमेदवारांना Internship देणेकामी विभाग निहाय संख्या निश्चित केली आहे.
३. महास्वयंम रोजगार पोर्टलवर विभाग निहाय म्हणजेच बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत विभाग, नगररचना विभाग, IT विभाग, विधी विभाग, आरोग्य विभाग, सुरक्षा रक्षक विभाग, मालमत्ता विभाग, वृक्ष प्राधिकरण विभाग इत्यादी सर्व विभागामध्ये शैक्षणिक अर्हता नुसार प्रोफाईल तयार केली आहेत.
४. “मुख्यमंत्री युवा कार्य प्राशिक्षण योजनेचे” ऑफलाईन अर्ज भरणेकामी प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज वाटप केले आहे.
५. दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ रोजी ३५ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
६. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी यांना मिळण्याकरिता दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता महासभा सभागृह, उल्हासनगर ३ येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.
७. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संदर्भात महापालिका संकेतस्थळ, Social Media (, Instagram & Twitter etc.) द्वारे प्रसिध्दी देण्यात आली आहे.
-: उद्दिष्ट :-
एकूण उद्दिष्ट – १६२
ऑनलाईन अर्ज संख्या – निरंक
ऑफलाईन अर्ज संख्या ३५
कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिलेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही सुरु आहे.
शैक्षणिक अर्हतेनुसार खालील प्रमाणे विद्यावेतन नियुक्तीपासून 6 महिने पर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना थेट बँक खात्यात DBT online पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
*शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन खालील प्रमाणे आहे.*
12 वी पास 6,000/-
आयटीआय/ पदविका 8,000/-
पदवीधर/पदव्युत्तर 10,000/-
यशस्वीरित्या
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
यासाठी उमेदवाराची पात्रता
✓ किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
✓ शैक्षणिक १२ पात्रता वी पास/ आयटीआय/पदविका/पदवी/पदयुत्तर
✓ उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
✓ उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
✓ उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
✓ उमेदवाराने रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुण-तरुणींनी वरील वेबसाईटवर आपली नोंदणी करावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.