‘Swachhata Hi Seva’ ulhasnagar : ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रम अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दि. १५ सप्टेंबर, २०२३ ते ०२ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा (swachhata hi seva) 2023” हा उपक्रम राबविण्यात येत असून, महात्मा गांधी ( mahatma gandhi) जयंतीचे औचित्य साधून दि. १ ऑक्टोबर, २०२३ रोजी “एक तारीख – एक घंटा (एक तारीख – एक तास ) हा स्वच्छता उपक्रम उल्हासनगर महानपालिकेच्या वतीने महापालिका ( Ulhasnagar Mahanagar Palika) क्षेत्रात एकूण ४३ ठिकाणी महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्री.अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व ४३ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या टीम सोबत राबविण्यात आला.
सदर स्वच्छता उपक्रमात मा. आमदार श्री. कुमार आयलानी, महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त श्री. जमीर लेंगरेकर, उपायुक्त श्री. अशोक नाईकवाडे, सर्व प्रभाग अधिकारी, सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी श्री. मनीष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक श्री.विनोद केणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. एकनाथ पवार, सर्व स्वच्छता निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी सौ. छाया डांगळे, महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख, परिवहन समितीचे सभापती श्री. सुभाष तानवडे , माजी नगरसेवक श्री राजेंद्र चौधरी, श्री. राजेश वधारिया , श्री. राजू जग्याशी, विविध पक्षाचे पदाधिकारी व इतर माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पत्रकार व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, रिक्षा युनियनचे सदस्य, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था, रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची टीम, आर. के. टी. कॉलेज, सी. एच. एम. कॉलेज, वेदांत कॉलेज यांचे प्राचार्य यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या टीमसह सहभाग दर्शविला.
सदरची स्वच्छता शहरातील विविध गलिच्छ ठिकाणी करण्यात आली. स्वच्छता चांगली झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महापालिका आयुक्त श्री.अजीज शेख यांनी विभाग प्रमुखांना स्वच्छतेबाबत महत्वाच्या सूचना देऊन श्रमदान केल्याचे छायाचित्र/सेल्फी फोटो swachhatahiseva. com या पोर्टलवर अपलोड करणेचे आवाहन केले.