राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विरोधात मनोहर उर्फ संभाजी भिडे ने केलेल्या वादग्रस्त विधानाचा उल्हासनगर काँग्रेस तर्फे निषेध.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला.
भिडेच्या या मनुवादी वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सह प्रभारी मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होते व त्यांनी भिडेच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
संभाजी भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टीकाटिप्पणी करते ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे, आणि आम्ही त्याचा निषेध करतो असे रोहित साळवे यांनी सांगितले.
यावेळेस ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, प्रदेश प्रतिनिधि वज्जिरुदिन खान, माजी गटनेता अंजली साळवे, सुनिल बहराणी, उपाध्यक्ष महादेव शेलार, अशेराम टाक, श्याम मढवी, विशाल सोनवणे, दीपक सोनोने, प्रा. नारायण गेमनानी, सिंधुताई रामटेके, भारती फुलवरिया, उषा गिरी ,सुलक्षण भालेराव, कालिंदी गवई, विद्या गाढे, शाहिस्ता परवीन, आबा साठे, रोहित गोखले, किशोर शेळके, शहनाज, राकेश मिश्रा, प्रविण वाघमारे, अन्सारी, प्रमोद शिंदे, निलेश जाधव सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.