उल्हासनगरात रिक्षाचालकावर हल्ला, एकाला ठार मारण्याची धमकी.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे संतापलेल्या अजय प्रसाद व त्याच्या साथीदारांनी एका रिक्षाचालकावर घरी घुसून तसेच रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अमित गोविंद गुजराथी (वय 34), हा उल्हासनगरातील रामनगर परिसरात राहत असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री, अमित आपल्या मित्रासोबत पंढरपूर चायवाला या दुकानात गेला असता,हे दुकान उल्हासनगर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष शंकर आहुजा यांच्या मालकीचे आहे. दुकानाचे चालक अजय प्रसाद याच्याशी पानमसाल्याच्या किंमतीवरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर अमितने प्रसाद याला कानाखाली मारल्याने प्रसादने त्याला धमकी दिली होती.
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता प्रसाद आणि त्याचे साथीदार, जवळपास 7 ते 8 जण, अमितच्या घरी घुसले. त्यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी अमितच्या आईने आणि मित्र अंगोली पिटर जाधवने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला;परंतु आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली.
नंतर अमितला घरी ओढून बाहेर काढत मोटरसायकलवर बसवून उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर नेले. स्टेशनवरही प्रसाद आणि त्याच्या साथीदारांनी अमितवर हल्ला करत त्याला ठार मारण्याची धमकी दिली. प्रसादने खिशातून चाकू काढून उपस्थित लोकांनाही भीती दाखवली.
या घटनेनंतर अमितने उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्यानुसार, प्रसाद व त्याच्या साथीदारांनी अमितच्या मित्राला मारहाण करून त्याच्या रिक्षाची काच फोडली होती.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पुलिसनी आता पर्यंत आरोपीना पकड़ले गीले नहीं.