उल्हासनगर – ५ मधिल गाऊन बाजार मार्केट मधिल भाजी मार्केटचा होणार पूर्णविकास.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाच्या ‘ महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर.
उल्हासनगर – ५ मधिल गाऊन बाजार मार्केट परिसरातील भाजी मार्केटच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन प्रशस्त अशी भाजी मार्केट उभारण्याकरिता नगरविकास विभागाच्या ‘ महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर शिवसेना महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी व महानगरपालिकेच्या अभियंत्यासह या भाजी मार्केटची पाहणी केली. भाजी मार्केट जुने झाल्याने त्याठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत होती. आता या ठिकाणी तळमजला + पहिला मजला तसेच सर्व सोयीनी सुसज्ज अशी प्रशस्त इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी महानगरपालिकेच्या अभियंत्याना दिल्या.
या पाहणी दरम्यान जेष्ठ नगरसेवक श्री. सतरामदास जेसवाणी, शिवसेना उपशहर प्रमुख श्री. संदीप डोंगरे, युवा सेना उप जिल्हा अधिकारी श्री. युवराज पाटील, उपविभाग प्रमुख श्री. अशोक दवणे, श्री. आदिनाथ कोरडे, श्री. विलास काकडे, श्री. गणेश शिंदे, श्री. राकेश चिकणे, शाखा प्रमुख श्री. विलास पालकर, श्री. विलास जामदार, युवा सेनेचे श्री. जितू सकपाळ, श्री. जितू नाडेकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, महानगरपालिका अभियंता श्री. शोकानी आदि उपस्थित होते.