महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने “खड्डा विथ सेल्फी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेला आहे.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
खड्डे विथ सेल्फी मनसेच्या वतीने आयोजन पावसाळा सुरु घेऊन महिना होत आला, तरी देखील उल्हासनगर महापालिकेच्या वतीने खड्ड्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने “खड्डा विथ सेल्फी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेने शहरातील खड्ड्याच्या विषयावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास महापालिका मुख्यालयात याच खड्ड्यांच्या फोटोचे प्रदर्शन भरविण्यात येईल असे देखील स्पर्धेचे आयोजक मनोज शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ऍम्ब्युलन्स सेवा, अग्निशमक विभाग, स्कुल बस, रिक्षाचालक तसेच इतर आपतकालीन व्यवस्था यांना देखील या खड्ड्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांच्याकडे केल्या होत्या. त्यात एका ऍम्ब्युलन्स चालकाने रस्त्यातील खड्ड्याबाबत संताप व्यक्त केला असल्याचे शेलार यांनी सांगितले. ऍम्ब्युलन्समध्ये रुग्ण जीवनमरणाच्या दारात असतांना आम्ही रुग्णाला वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रयत्नशील असतो, मात्र शहरातील खड्ड्यामुळे आम्हाला बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते अशी खंत देखील एका ऍम्ब्युलन्स चालकाने आपल्याकडे व्यक्त केली असल्याचे मनोज शेलार यांनी सांगितले.
अखेर महापालिका प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या पुढाकाराने “खड्डा विथ सेल्फी” या स्पर्धेचे आयोजन मनोज शेलार यांनी केले आहे. या स्पर्धेत विजेता म्हणून प्रथम पारितोषिक 2222 रुपये, द्वितीय पारितोषिक 1111 रुपये आणि तिसरे पारितोषिक 555 रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच या विषयावर पालिकेने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास याच फोटोचे प्रदर्शन पालिका मुख्यालयात करण्यात येईल असा इशारा देखील शेलार यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.