म्हाळगावात गुडघ्या इतके पाणी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास.
उल्हासनगर म्हारळगांव : नीतू विश्वकर्मा
म्हारळगावातील गणेश नगर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुडघ्या इतके पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याचा त्रास हा गणेश नगर परिसरातील रहिवाशांच्या पाचीलाच पुजले असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.याच रोड वरून मारळेश्वर विद्यालय म्हारळ या शाळकरी विद्यार्थी ये जा करत असतात. अर्धवट रोडचे काम आणि नाला नसल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी कमरे इतके पाणी साचते जवळ पास एक हजारोंन अधिक विद्यार्थ्यांचा जीवमुठीत घेऊन हा प्रवास पावसाळ्यामध्ये सुरू असतो.याच परिसरात असणाऱ्या चारशे ते पाचशे कुटुंबांना देखील याच कमरेइतके पाण्यातून प्रवास करावा लागतो. रोडच्या बाजूला असलेल्या मोठाले खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.मात्र ग्रामपंचायत म्हारळ आणि शासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत.आमदार कुमार आयलानी मात्र उल्हासनगर शहरातील अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या कामात व्यस्त आहे. म्हारळच्या नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.