अंबरनाथ मधील चिखलोली आदिवासी पाड्याला मिळाले पाणी.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ मधील चिखलोली आदिवासी पाड्यामध्ये मागील काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
आज ही वचन पूर्तता करण्यात आली असून या भागात माझ्या स्थानिक विकास निधीतून आमदार निधी बोअरवेल सुरू करत पाण्याची टाकी बसवण्यात आली. अंबरनाथ मधील युवासेनेच्या वतीने या बोअरवेल व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याने येथील आदिवासी समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले असून येणाऱ्या काळात आरोग्य विषयक तसेच इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देत या भागाचा कायापालट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री.सुभाष साळुंके, श्री.संदीप तेलंगे, युवासेना तालुका प्रमुख श्री. शैलेश भोईर, महिला आघाडीच्या सौ.सुषमा रसाळ, सौ.लीना सावंत, सौ.वनिता वाघ, युवासेना शहर अधिकारी श्री.राहुल सोमेश्वर, श्री.निशाण पाटील, श्री. नारायण धोंडे, श्री.निखिल चौधरी, श्री. विकास सोमेश्वर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक उपस्थित होते.