उल्हासनगर येथे मूलभूत अधिकार संघर्ष समिती (MASS) ची बैठक संपन्न.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
दिनांक १३ एप्रिल रोजी उल्हासनगर येथे मूलभूत अधिकार संघर्ष समिती (MASS) चे ठाणे जिल्हा संयोजक श्री. अमर जोशी यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वसंध्येला महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीला इतर सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबद्दल सामान्य जनतेमध्ये संदेश देण्यासाठी आणि त्यानंतर विविध सरकारी संस्थांसोबत त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संयुक्तपणे आयोजित केल्या जाणार्या ग्राउंड क्रियाकलापांची योजना यांच्यावर सविस्तर चर्चा झाली.
ह्या बैठकीला Right to Health ह्या विषयावर MASS मुंबई तर्फे श्री. विश्वास उटगी साहेब यांनी मार्गदर्शन केले.बैठकीला MASS मुंबई तर्फे श्री. संग्राम पेटकर आणि श्री. दिनेश राणे यांनी मार्गदर्शन केले.बैठकीत उल्हासनगर मध्ये MASS च्या वाढीसाठी काय करता येईल ह्यावर चर्चा करण्यात आली. ही बैठक यशस्वी होण्यासाठी श्री. अमर जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
यावेळेस वंचित बहुजन आघाड़ीचे उल्हासनगर जिलाअध्यक्ष शेषराव वाघमारे, काँग्रेस – आप – एनसीपी – शिवसेना (उद्धव) गटाचे पदाधिकारी सामाजिक संघटनेचे आंनदा (दादा) होवाळ, शशिकांत दायमा, पद्माकर अहिरे, योगिता घड़गे, परमानंद गरेजा, चरणसिंह लबाना, हरजीत सिंह, रवि सिंह, योगेश केदार, मीरा सपकाले, MASS चे ठाणे विभाग सदस्य अमित उपाध्याय, चिराग फक्के, आनंद शुक्ला, रंजीत गौड़, केशव सिंह, मीनू कुरियोकोस, अख्तर हुसैन खान उपस्थित होते.