उल्हासनगर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागामार्फत वर्ष २०२२-२३ मध्ये विविध खेळांमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकात प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
आज सोमवार दिनांक १०/०४/२०२३ रोजी मा. श्रीम. प्रियंका राजपूत, उप आयुक्त (क्रीडा), उल्हासनगर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागामार्फत वर्ष २०२२-२३ मध्ये विविध खेळांमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकात प्राविण्य मिळविलेल्या साधारण ३५०० खेळाडूंना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मीडटाऊन हॉल, गोल मैदान, उल्हासनगर १ येथे पार पाडण्यात आलेला असून वैयक्तिक खेळांच्या १४-१७ वर्षे या वयोगटातील विविध खेळांमध्ये प्रथम क्रमांक सेंच्युरी रेयॉन हाई स्कूल, शहाड, व्दितीय क्रमांक महाराष्ट्र मित्र मंडळ माध्यमिक शाळा, उल्हासनगर १ आणि तृतीय क्रमांक गुरुनानक हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, उल्हासनगर ४ तसेच १९ वर्षे वयोगटातील विविध खेळांमध्ये प्रथम क्रमांक श्रीमती.सी.एच.एम कॉलेज, उल्हासनगर ३, व्दितीय क्रमांक एस. एस. टी. कॉलेज, उल्हासनगर ४ आणि तृतीय क्रमांक वेदांता ज्युनिअर कॉलेज, विठ्ठलवाडी यांनी सर्वाधिक प्रमाणपत्रे मिळविली आहेत.
तसेच सांघिक खेळामध्ये १४-१७ वर्षे या वयोगटातील विविध खेळांमध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र मित्र मंडळ माध्यमिक शाळा, उल्हासनगर १, व्दितीय क्रमांक स्वामी शांति प्रकाश ईंग्लीश हाई स्कूल, उल्हासनगर ५ आणि तृतीय क्रमांक सेठ परशुराम पारूमल न्यू इरा हाई स्कूल आणि जुनिअर कॉलेज, उल्हासनगर ३ तसेच १९ वर्षे वयोगटातील विविध खेळांमध्ये प्रथम क्रमांक श्रीमती. सी.एच.एम कॉलेज, उल्हासनगर ३, व्दितीय क्रमांक वेदांता ज्युनिअर कॉलेज, विठ्ठलवाडी आणि तृतीय क्रमांक एस. एस. टी. कॉलेज, उल्हासनगर ४ यांनी सर्वाधिक प्रमाणपत्रे मिळविली आहेत.
सदर कार्यक्रमास उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी मा. श्री. अशोक नाईकवाडे, उप-आयुक्त (मुख्यालय), मा. डॉ. सुभाष जाधव, उप-आयुक्त (शिक्षण), मा. श्री. किरण भिलारे, मुख्य लेखा अधिकारी, मा. श्री. अशोक मोरे, प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग), मा. श्रीम. छाया डांगळे, जनसंपर्क अधिकारी, मा. श्री. अंकुश कदम, भांडार विभाग प्रमुख, मा. श्री. राजेश घनघाव, विभागप्रमुख (दि.क.यो.वि.) उपस्थित होते.