सचिन कदम यांचा इशारा – पाणीपट्टी दरवाढ रद्द करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल!

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेने १ एप्रिल २०२५ पासून पाणीपट्टी दरात अत्यंत भरमसाठ वाढ केली असून, नागरिकांवर मोठा आर्थिक भार टाकला आहे. या अन्यायकारक दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसेचा इशारा:
२८ मार्च २०२५ रोजी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले असून, ही अन्यायकारक दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा मनसेचे उपाध्यक्ष सचिन कदम यांनी दिला आहे.
भरमसाठ दरवाढ (जुना व नवीन दर) :
₹३६००/- वरून थेट ₹८०००/-
₹१८००/- वरून थेट ₹६५००/-
₹१२००/- वरून थेट ₹३०००/-
मनसे जनआंदोलन – नागरिकांचा एल्गार!
ही दरवाढ तात्काळ मागे घेतली नाही, तर मनसेच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उग्र रूप धारण करेल, असा इशारा देण्यात आला आहे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन कदम संपर्क: 9323739368
(उपाध्यक्ष, मनसे) यांनी केले आहे.