Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News
कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड तरफे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात भाजप स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
कल्याण पूर्व मंडळ भारतीय जनता पक्षाच्या आमदार गणपत सेठ गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) वतीने मोठ्या उत्साहात भाजप स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी झेंडावंदन कार्यक्रम व भारत माता पूजन सहकारी पदाधिकारी बंधू भगिनीं सोबत हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्र आणि समाजाच्या विकासासाठी सदैव समर्पित, व्यक्तिपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश ही जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची शिकवण देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस.
जनतेने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून लोकशाही मूल्यांवर आधारित सुदृढ़, सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मा. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्ष आगेकूच करीत आहे.
भारतीय जनता पक्षाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित समाजातील सर्व घटकांना भाजपा स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिली.