उल्हासनगर शहर स्वच्छतेच्या नावाखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली साफसफाईचे कंत्राट देण्यात येत आहेत,वार्षिक १० कोटी खर्च करुन २७० सफाई कामगार प्रभाग समिती ३ मध्ये काम करणार आहेत व तिथले कामगार शहरातील उर्वरित भागात हलवण्यात आले आहेत.
वरवर हे फार चांगलं वाटत असलं तरी बेरोजगारांना वेठबिगार करणारी प्रक्रिया आहे. सध्या जो कंत्राटी कामगारांचा विषय आहे तो ८ वर्षांसाठी देऊन वर्षाला कोटींची लूट आहे.
या कंत्राटाला उल्हासनगरा तील नागरिकांनी जोरदार विरोध करण्याची गरज आहे असे म्हणत सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगडे,राज असरोंडकर, गजानन शेळके यांनी प्रभाग समिती ३ मधून विरोधाची सुरूवात केली आहे.