अंबरनाथ तालुक्यातील कु. वैष्णवी पाटील पहिल्या महिला केशरी कुस्ती स्पर्धेत हिने उपविजेतेपद पटकावल्याबद्दल आमदर डॉ बालाजी कीनीकर नी तीच्या घरी जाऊन भेट घेत अभिनंदन केले.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
नुकत्याच सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला केशरी कुस्ती स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील कु. वैष्णवी पाटील हिने उपविजेतेपद पटकावल्याबद्दल तीच्या घरी जाऊन भेट घेत अभिनंदन केले. कु. वैष्णवी हिच्या या कामगिरीमुळे अंबरनाथ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून येणाऱ्या काळात तिच्याकडून उत्तम कामगिरी पार पडो अशा शुभेच्छा देत कौतुक केले.
याप्रसंगी उल्हासनगर शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री. विजय पाटील, श्री. संदीप डोंगरे, युवासेनेचे श्री. युवराज पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.