भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्या संदर्भात चर्चा करण्याकरीता अंबरनाथ मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पूर्व भागातील वडवली मधिल नगरपरिषदेच्या आरक्षण क्र.११९ नुसार जागेचा विकास करण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने माझ्या प्रयत्नांतून समाज कल्याण विभागाच्या निधीतून व नगरपरिषदे मार्फत ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी सांस्कृतीक भवन उभारण्या संदर्भात चर्चा करण्याकरीता रविवारी अंबरनाथ मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सांस्कृतिक भवन उभारण्याचा संदर्भात उपस्थित समाज बांधवांनी आपल्या सूचना मांडल्या, त्या सूचनांनुसार सर्व सुविधांनी सुसज्ज असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
या बैठकीला भदन्त राहुल रत्न, भदन्त कश्यप, उपशहर प्रमुख श्री.संदीप मांजरेकर,श्री.संदीप डोंगरे, माजी नगरसेवक श्री. उमेश गुंजाळ, उत्तर भारतीय विभाग शहर संघटक श्री.प्रमोदकुमार चौबे, विभाग प्रमुख श्री. संतोष शिंदे, अंबरनाथ नगरपरिषदेचे वास्तू विशारद पॅनलवरील श्री.अतुल कुडतरकर, अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील बौद्ध उपासक व उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.