भिडेंना चावलेल्या कुत्र्याच्या स्मारकासाठी ५१ हजारांचे बक्षीस – ॲड. जय गायकवाड यांची घोषणा.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याच्या घटनेवर खोचक प्रतिक्रिया देत, त्या कुत्र्याच्या स्मारकासाठी ५१,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
संभाजी भिडे यांचे अनेक वादग्रस्त विधान आणि कृती यामुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत. रायगडावर दीपप्रज्वलन करणाऱ्या तरुणांना त्यांनी ११ हजार तलवारी वाटण्याची घोषणा केली होती. याशिवाय, महात्मा गांधी, महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल झाले असूनही अजून अटक करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर भिडेंना कुत्रा चावल्याची घटना घडताच राज्याची संपूर्ण यंत्रणा जागृत झाली, यावर ॲड. गायकवाड यांनी टीका करत ही घटना ‘ऐतिहासिक’ ठरवली. “भविष्यातील पिढ्यांना या ऐतिहासिक घटनेची आठवण राहावी म्हणून सांगलीतील माळी गल्ली येथे जे कोणी त्या कुत्र्याचे स्मारक उभारतील, त्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली.
भिडे हे ‘श्वानप्रेमी’ असल्याचे देखील त्यांनी नमूद करत, अशा व्यक्तींसोबत घडलेल्या घटनांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे असल्याचे सांगितले.