Ambernath breaking newsBreaking Newsheadline
अंबरनाथ मधील वडवली विभागात “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ” उभारण्याकरिता समाज कल्याणचा ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पूर्व भागातील वडवली विभागातील आरक्षण क्र. ११९ समुदाय केंद्र ( कम्युनिटी सेंटर) करिता आरक्षित जागेवर “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ” उभारण्याकरिता समाज कल्याणच्या ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ” ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी सर्व सुविधांनी सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याने या कामाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अंबरनाथकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
अंबरनाथ शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहराचा विकास हि झपाट्याने होत आहे. शहरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने शहरामध्ये नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे नगरपरिषदेमार्फत प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये अंबरनाथ पूर्व भागातील वडवली येथील ०.०५ हे.आर. क्षेत्रावर आरक्षण क्र.११९ हे समुदाय केंद्र ( कम्युनिटी सेंटर) साठी आरक्षित आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ” उभारण्यात यावे अशी या परिसरातील नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असल्याने आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे या विकास कामाला मंजुरी देत निधी उपलब्ध करुन द्यावा अशी लेखी मागणी केली होती. तसेच याकरिता शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत समाज कल्याणच्या ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत” निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या सांस्कृतिक भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.