उल्हासनगरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संघटित रक्तदान शिबिर संपन्न.
उल्हासनगर:नीतू विश्वकर्मा :
देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उल्हासनगर येथिल वडोल गांवात उम्मीद फाऊंडेशन च्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी संघटित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते साहेब (अंबरनाथ) व फादर के जी फिलिप्स मा. नगरसेविका सविता तोरणे रगडे पोलिस निरीक्षक काटकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार श्री पप्पू कलानी साहेब मा सभागृह नेते धनंजय बोडारे साहेब मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहल बनसोडे व बालरोग तज्ज्ञ डॉ मोरे मा नगरसेवक गजानन शेळके, फिरोज खान, गजानन म्हात्रे,अशोक जाधवजय भवानी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या सह विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या या शिबिरात २०० लोकानी सहभाग घेतला असुन ११४ रक्तदात्यानी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे .उल्हासनगर येथिल वडोल गांव या ठिकाणी शिवाजी रडगे यांच्या मार्गदरशनाखाली उम्मीद फाऊंडेशन चे अध्यक्ष शरद म्हात्रे व त्यांचे सहकारी दरवर्षी संघटित रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. दरम्यान गरजु लोकाना या रक्ताचा उपयोग होतो . तेव्हा दरवर्षी प्रमाणेच या ही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन उम्मीद फाऊंडेशन च्या वतीने संघटित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराला अनेक मान्यवरानी भेट दिली आहे . तर या शिबिरात २०० लोकानी सहभाग नोंदवला असुन ११४ रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्याची माहीती उम्मीद फाउंडेशनचे अध्यक्ष शरद म्हात्रे यानी दिली आहे . याच रक्तदान उपक्रमातुन गरजु नागरिकाना रक्त देण्याचे स्तुत्य काम उम्मीद फाऊंडेशन करत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वडोळगावतील नागरिकांनी व उम्मीद फाऊंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.