उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडीची निवडणूक रणनीती ठरली – लवकरच होणार महत्त्वपूर्ण बैठक






उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
काल दादर येथील राजगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उल्हासनगर शहरातील पक्षाची आगामी रणनीती मांडण्यात आली.
यावेळी उल्हासनगरातील विविध मोठ्या राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याची तयारी दाखवली असून, त्यांनी शहराध्यक्ष ॲड. उज्वल महाले यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. याची सविस्तर माहिती स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर ठेवण्यात आली.
साहेबांच्या आदेशानुसार लवकरच उल्हासनगर शहरात वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत शहरातील राजकीय घडामोडींवर पुढील दिशा व कार्यपद्धती ठरवली जाण्याची अपेक्षा आहे.
याच प्रसंगी राजगृहावर शाहिर शितलजी साठे, शाहीर सचिन माळी, मुंबई महिला अध्यक्षा मा. स्नेहल सोहनी, नवी मुंबई महिला अध्यक्षा मा. शिल्पाताई रणदिवे यांची देखील उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी पक्षाच्या धोरणांवर, तसेच उल्हासनगरातील राजकीय घडामोडींवर मार्गदर्शन केले.
या भेटीत महासचिव मा. निलेश देवडे, कोषाध्यक्ष मा. ईश्वरभाऊ सोनवणे, शहर उपाध्यक्ष मा. दिनेश पवार, प्रसिद्धी प्रमुख मा. नितिन भालेराव तसेच युवा कार्यकर्ते मा. अशोक पवार उपस्थित होते.
👉 या घडामोडींमुळे उल्हासनगरातील आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव लक्षणीय वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.








