Ulhasnagar Breaking News
उल्हासनगर महापालिकेच्या उल्हासनगर – ५ मधिल अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ बंद करा – मनसे
उल्हासनगर महापालिकेच्या उल्हासनगर – ५ मधिल अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ बंद करा – मनसे
उलहासनगर महापालिकेच्या उल्हासनगर 1 मधील राणा खदान या कचरा डेपोची क्षमता संपण्या आधिच उल्हासनगर महापालिकेने कचरा डेपोसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करने आवश्यक होते.परंतु तत्कालीन सत्ताधारी व प्रशासन यांच्या नाकर्तेपणा मुळे कचराडेपो साठीच्या पर्याय जागेची व्यवस्था होऊ शकली नाही.कारण महापालिके कडून कचराडेपो साठी एकही भुखंड राखीव ठेवला गेला नाही किंवा तशी तरतुदही सुद्धा केली गेली नाही.त्यामुळे कचराडेपोच्या जागेसाठी महपालिकेला राज्य शासनावर अवलंबून रहावे लागत आहे.आणि शासनाने कचराडेपो साठी जी जागा दिली आहे तेथे कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.आशा वेळेला पर्यायी जागेची व्यवस्था करणे हे सुद्धा महापालिकेचे कर्तव्य होते.परंतु महापालिका या कचराडेपोच्या जागे बाबत गंभीर दिसत नाही असा आरोप शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे.राणा खदान येथिल कचरा डेपोची क्षमता संपल्यामुळे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी फुलेनगर,गायकवाडपाडा,उल्हासनगर – ५ येथे नागरी वस्तीत असलेल्या व कचरा डेपोसाठी आरक्षित नसलेल्या भुखंडावर उल्हासनगर शहरातील कचरा डंप करायला सुरुवात केली.व स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी त्यानां आश्वसन दिले होते की हा कचरा डेपो फक्त दोन ते तीन महिन्यासाठी असून लवकरात लवकर कचराडेपो साठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात येईल.तत्कालीन आयुक्तांनी हे आश्वासन ऑक्टोबर २०१६ मध्ये दिल होत.परंतु दोन ते तीन महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या या कचरा डेपोला आज जवळपास सहा वर्षे उलटले व बघता बघता या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा महाकाय डोंगर तयार झाला.परंतु महापालिकेला शासनाकडून आजही कचरा डेपोसाठी पर्यायी जागा उपलब्ध झालेली नाही.त्यामुळे उल्हासनगर महानगर पालिका आपला दैनंदिन कचरा आजही येथेच टाकत आहे.या कचरा डेपोमुळे 40 ते 45 वर्षापेक्षा जास्त काळ या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या कचराडेपो मुळे निर्माण झालेली दुर्गंधी व वेळोवेळी लागलेल्या आगीच्या धुरामुळे मोठया प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.या कचरा डेपोच्या परिसरात दोन शाळा सुद्धा आहे.या शाळांमध्ये जवळपास 800 ते 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना सुद्धा या दुर्गंधी व आगीच्या धुराच्या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होत आहे.अशा अनेक तक्रारी आमच्याकडे उपलब्ध आहेत.दुर्गंधी व वारंवार लावल्या जाणाऱ्या आगीच्या धुरामुळे होणारे प्रदूषण यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.परंतु महापालिका प्रशासनाला या नागरिकांच्या आरोग्याबाबात सुद्धा कुठंलही गंभीर्य दिसन नाही असेही बंडू देशमुख यांनी सांगितले.
तसेच शासनाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरी वस्ती आहे किंवा मोठया प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत अशा ठिकाणी कचरा डेपो सुरु करता येत नाही.परंतु उल्हासनगर महानगर पालिकेने शासनाच्या या नियमांची पायमल्ली करुन शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत हा कचरा डेपो सुरुच ठेवला व वारंवार विनंती करून सुद्धा महापालिका प्रशासन हा कचरा डेपो हटवण्यासाठी जाणुन बुजून टाळाटाळ करीत आहे.कारण हा कचराडेपो सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनला आहे.या कचराडेपो विविध कारणे पुढे करून करोड रुपयाच्या निविदा काढल्या जातात.मनसेच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की या कचरा डेपोमुळे पसरणारी दुर्गन्धी व वारंवार आगीच्या धुरामुळे होणारे प्रदूषण हे तात्काळ थांबवावं व स्थानिक नागरिकांना दिलासा दयावा.मनसेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात आल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी मनसे शिष्ट मंडळासह कचराडेपोची पाहणी करून या काचराडेपो बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तुम्ही आंदोलन करू नये असे आश्वासन दिल्यानंतर मनसेच्या वतीने हे आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आलं मात्र या कचराडेपो बाबत लवकर निर्णय झाला नाही तर मात्र या विभागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठीआम्हाला मनसे स्टाईलने आंदोलन कराव लागेल.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव,सचिन बेंडके,मुकेश सेठपलांनी,विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे,अनिल गोधडे,सागर चौहान,प्रमोद पालकर विभाग उपाध्यक्ष गणेश आठवले,मनविसेचे तन्मेश देशमुख,सचिन चौधरी,यांच्यासह रवी अहिरे,गणेश श्रीमाळवे.