वंचितकडे भाजी पाला विक्रेत्यांची मदतीसाठी हाक.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
जवळ जवळ तीस,चाळीस हजार लोक वस्ती असलेल्या कुर्ला केम्प परिसर उल्हासनगर ५. येथे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजी विक्रेते हे भाजी विक्री करतात. पण आता काही दिवसांपासून उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना सकाळी लवकर ८:३० वाजताच हुसकावून लावतात या मुळे भाजी विक्रेत्यांना नुकसान तर होतेच. पण तीथल्या स्थानिक महिलांना सुद्धा याचा त्रास होत आहे सकाळी घरातली कामे करावी की भाजी पाला खरेदी करावा हे आता त्यांना कठीण होत आहे. म्हणूनच मदतीसाठी परिसरातील भाजी विक्रेत्यांनी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराचे अध्यक्ष मा शेषराव वाघमारे साहेब यांना लेखी निवेदन देऊन व वंचित पक्षाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली असता शहराचे अध्यक्ष मा.शेषराव वाघमारे साहेब यांनी त्वरित तक्रार निवारण अधिकारी मा.नाना चव्हाण व पक्षाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मा अजिज शेख साहेब यांना आपल्यापरीने तमाम भाजी विक्रेत्यांचे सकाळी लवकर हुसकावून लावल्यामुळे होणारे नुकसान व त्यांना होणारा त्रास सांगून आयुक्तांकडे निवेदन दिले. निवेदनात भाजी विक्रेत्यांना सकाळी ८:३० ला न उठवता भाजी विक्रीसाठी वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आणि ती मागणी मा.आयुक्तांनी मान्य केली आहे त्या मुळे त्यांचे वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराकडुन धन्यवाद.
यावेळी प्रविण माळवे (शहर महासचिव) उज्वल महाले (युवा शहर उपाध्यक्ष) भगवान देशमुख (शहर उपाध्यक्ष) बाळासाहेब अहिरे (शहर उपाध्यक्ष) भारत रणदिवे (युवा उपाध्यक्ष) नितिन भालेराव (चोपडा वार्ड अध्यक्ष) सुभाष उघडे (वरिष्ठ कार्यकर्ते) लक्ष्मण मोरे (युवा कार्यकर्ते)मुकेश चौथमल (वार्ड उपाध्यक्ष)
पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.