Breaking NewsUlhasnagar
मानस टॉवर दुर्घटनेला कर्तव्यात कसूर करून,कामात दिरंगाई करणारा प्रभाग समिती क्रमांक ४ चा प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी सर्वस्वी जबाबदार.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ४ च्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी दिनांक २२/०७/२०२२ रोजी मानस टॉवर च्या व्यावस्थापकांना मान्यताप्राप्त अभियंत्यामार्फत सदर ईमारतीची संरचनात्मक तपासणी १५ दिवसांमध्ये करून घेणे आणि तसा अहवाल महानगर पालिकेला सादर करणे अशी कायदेशीर नोटीस बजावलेली होती,परंतु त्यानंतर महानगर पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखविली असती तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती,नोटीस आणि मुदत देऊन दीड महिना उलटला तरी प्रभाग समिती क्रमांक ४ येथील अधिकाऱ्यांनी कसल्याच उपाययोजना केलेल्या नसल्याने आणि आपल्या कर्तव्यात कसूर करून दिरंगाई केलेली आहे, म्हणून सदर घटनेस उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे सध्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश अरविंद शिंपी यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी,सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
४ बळी गेल्यानंतर ईमारत रिकामी करण्यासाठी धावपळ करणाऱ्या उल्हासनगर महानगर पालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे.
उ.म.पा. प्रशासनाने वेळीच ईमारत रिकामी केली असती तर या बिचाऱ्यांचा जीव वाचला असता अशी शहरात सर्वत्र चर्चा आहे.