कल्याण-मुरबाड हायवे खड्डेमय असल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक युवकांच्या वतीने खड्ड्यात उभे राहून मानवी मनोरे रचले.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
नॅशनल हायवे क्रमांक ६१ कल्याण मुरबाड हायवे हा रस्ता गेल्या २वर्षा पासुन खड्डेमय झालेला आहे. स्थानिकांच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार उपोषण करून सुद्धा अद्याप हा रस्ता जैसे थे आहे. रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे आहेत आणि या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे येथे शेकडो अपघात होतात.काहीच दिवसापूर्वी ज्येष्ठ शिवसैनिक नारायण भोईर यांचा सुद्धा या खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू झाला होता.तरीसुद्धा अद्याप त्यांच्या घरी एकही प्रशासकीय अधिकारी यांनी जाऊन भेट दिलेली नाही. आणि त्यांना कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही. ठेकेदारावर आणि प्रशासकीय अधिकारी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा स्थानिकांची मागणी आहे तरीसुद्धा अजून पर्यंत त्यांचावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. म्हारळ पाडा ते पाचवामैल हे अंतर जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतराचे असेल या ठिकाणी जाण्यासाठी अर्धा तास लागतो आणि संध्याकाळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.कल्याण ग्रामीण भागात अशा अनेक आदिवासी पाडे आहेत. तेथील महिला प्रसूती साठी त्यांना उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात यावे लागते व या ठिकाणी येण्यासाठी हाच मार्ग आहे.या ठिकाणी अंबुलन्स जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते. अनेक पत्रकार बांधवांच्या वतीने या रस्त्या संदर्भात आवाज उठवलेला आहे तरीसुद्धा सरकार आणि प्रशासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बसलेले आहेत. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे आहेत.पाऊस पडल्यानंतर इथे तलावाचे स्वरूप दिसून येते.मुख्यमंत्री महोदय यांनी
४० दिवसांत ७५० कामे हाती घेतले आहेत.पण त्यांना कल्याण मुरबाड रस्ता महत्वाचा वाटत नाही का असा प्रश्न पडतो. नितीन गडकरी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिकांकडून अनेक पत्रव्यवहार झाले तरीसुद्धा या रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाही या कारणामुळे. सरकारचे आणि प्रशासकीय अधिकारी यांचे लक्ष वेधवे म्हणून दही हंडी उत्सवा निम्मित शिव नवतरुण गोविंदा पथक कांबा येथील तरुणांनी कै.नारायण महादू भोईर यांना मानवी मनोरे रचून श्रद्धांजली वाहिली. आणि प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचा जाहीर निषेध केला.