Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

वाढती पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येक विहीर आणि बोअरवेल जवळ शोषखड्डा तयार करणे काळाची गरज मी कल्याणकर सामाजिक संस्थेने केडीएमसीच्या आयुक्तांना पत्र.

 

कल्याण : नीतू विश्वकर्मा 

भविष्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता भूजल पातळी वाढवणे , निसर्गाचे रक्षण , संवर्धनासाठी  कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व विहरी व बोअरवेल यांचे रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे , सर्व विहरी व बोअरवेल जवळ 5 फूट × 5 फूट × 5 फूट क्षेत्रफळाचा एक शोषखड्डा करून तेथे सोकपिट बसवून बाजूला गोल गोटे /विटांचे तुकडे / गिट्टी व खडी टाकून शोषखड्डा भरला व पावसाचे पाणी त्यात सोडले तर जमिनीतील पाण्याची पातळी नक्की वाढेल या प्रकारची सूचना  महापालिका आयुक्त यांना केली व तसे त्यांना लेखी पत्र दिले .. या विषया संदर्भात आयुक्तांनी शहर अभियंता यांच्या दालनात आज मिटिंग ठेवली होती.

सकारात्मक चर्चा होऊन प्राधान्याने महापालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालय / शाळा / बगीचे / महापालिका कार्यालय येथे या प्रकारचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यासंबंधी निविदा देखील लवकरच काढण्यात येणार आहे.

” जल है तो कल है ” …

” पाणी असेल तर दुष्काळ नसेल ” ..

या उपक्रमासाठी आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे अमरावती येथील जलक्रांती अभियानाचे मा. सुहास सोहोनी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्यांचे मनापासून धन्यवाद.

आयुक्त व शहर अभियंता व सर्व अधिकाऱ्यांचे देखील मनापासून धन्यवाद ..नितीन म. निकममा. नगरसेवक / जायंट किलरअध्यक्ष :- मी कल्याणकर सामाजिक संस्था ( रजी.)






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights