कामगार एकजुटीचा आणि शिवसेना जेष्ठ कार्यकर्त्यांचा माध्यस्तीचा विजय.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण लोकसभा क्षेत्रातील अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात सेंट गोबन नावाच्या कंपनीच्या अडमुठे धोरण वापरून कामगारांना त्रास देणाऱ्या व्यवस्थापनाने गेल्या १५ दिवसांपासून जवळपास ३०० कामगारांना कामावरून कमी केले होते. कामगारांना कामावर येण्यास मनाई केली होती. कामगारांना याचे कारण विचारले असता, सेंट गोबन कंपनीच्या कामगारांना त्याच कंपनीच्या दुसऱ्या युनिट मध्ये अनधिकृत रित्या कामाला जाण्यास सांगितले होते,कामगारांनी जाण्यासाठी होकार दर्शविला, परंतु त्याकरिता लेखी आदेश द्यावा ही मागणी त्यांनी कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदाराला केली.कंपनीने ही मागणी मान्य केली नाही आणि या गोष्टीचा राग मनात धरून गेल्या १५ दिवसांपासून ३०० कामगारांना कंपनीने कामावर न घेता घरी बसविले. यामुळे या सर्व कामगारांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, आज दि.१८/६/२४ रोजी कल्याण शहरप्रमुख-महेश गायकवाड, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख-महेश पाटील, अंबरनाथ तालुका प्रमुख-चैनू जाधव,महिला उपजिल्हा प्रमुख-इंदिरताई भोईर, महिला अंबरनाथ तालुकाप्रमुख-रोशना ताई पाटील ,कामगार नेते-महेश सरफरे ,उपशहरप्रमुख-प्रशांत बोटे, समाजसेवक-विजय बाकाडेआणि शिवसैनिक यांनी सेंट गोबन कंपनी येथे जाऊन कंपनी व्यवस्थापक, ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या प्रकरणाचा जाब विचारून सर्वच्या सर्व ३०० कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यास भाग पाडले. यापुढे कुठल्याही प्रकारचे बेकायदा कृत्य कामगारांवर लादनार नाही याची हमी घेतली आणि समज दिली.