उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात विश्व तंबाखू निषेध दिवस साजरा.
![]() |
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थ विरोधी दिवस ३२ मे मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय डॉ अशोक खतुजा , ज्येष्ठ नागरिक उल्हासनगर,तसेच सिंधी असोशियशन,रोटरी क्लब, उल्हासनगर पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी, स्टाफ नर्स, आणि नागरिक उपस्थित होते. मागील एक वर्षापासून ज्या नागरीक, अधिकारी, कर्मचारी यांचे स्वागत, अभिनंदन करण्यात आले.डॉ खातुजा अशोक, डॉ वटकर,जया स्टाफ नर्स यांनी मनोगत व्यक्त केले. तृप्ती दांडेकर , डेंटल हैजेनिष्ट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तंबाखू विरोधी शपथ सर्वांनी ग्रहण केली. मां जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी व्यसन मुक्ती बाबत मार्गदर्शन केले.